Monday, April 28, 2025

सोनईच्या ‘या’ व्यापाऱ्यानं ‘हे’ काय केलंय भलतंच…! छत्रपती संभाजीनगरच्या ‘बाबा पेट्रोल पंप’जवळची दीड हजार कोटींची लष्कराची मालमत्ता बळकविण्याचा प्रयत्न…! ‘लोकपत’ पुराव्यासह लवकरच करणार पर्दाफाश..!

लोकपत न्यूज नेटवर्क / अहिल्यानगर 

कष्ट न करता अमाप पैसा कमविण्याची एकदा का हाव सुटली, की माणूस कुठल्या थराला जाईल, याची काहीही शाश्वती देता येत नाही. आता हेच पहा ना, नेवासे तालुक्यातल्या सोनईच्या एका व्यापाऱ्यानं अफाट पैसा कमविण्याच्या नादात भारतीय लष्करालादेखील  फसविण्याचा प्रयत्न चालविला आहे. छत्रपती संभाजीनगरच्या बाबा पेट्रोल पंपाजवळ असलेल्या तब्बल दीड हजार कोटींची स्थावर मालमत्ता बळकविण्याचा प्रयत्न सोनईच्या या व्यापाऱ्यानं केला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यासंदर्भात सोनईतले भाजप कार्यकर्ते लवकरच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून रितसर तक्रार करणार आहेत.

या संदर्भात ‘लोकपत’ न्यूज नेटवर्ककडे सविस्तर असे पुरावे येत आहेत. सर्व पुरावे आमच्या (लोकपत न्यूज नेटवर्क) हाती आल्यानंतर संबंधित तक्रारदाराच्या मुलाखतीसह (बाईट) हा विषय राज्यभर आम्ही प्रसारित करणार आहोत. दरम्यान, सोनईच्या या व्यापाऱ्याने गाळे विक्रीमध्ये अनेकांना आर्थिकदृष्ट्या फसवलं आहे. यापैकी महेश सोमनाथ कडेल या सराफ व्यावसायिकाने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदनदेखील दिलेलं आहे.

सोनई पोलीस नक्की काय करताहेत?

सोनईतल्या तिरुपती कॉम्प्लेक्समध्ये असलेल्या गाळे विक्रीच्या व्यवहारात सराफ व्यावसायिक महेश कडेल यांची आर्थिक फसवणूक झाली आहे. यासाठी कडेल यांनी पत्नीचे सोन्याचे दागिने नगर अर्बन बँकेत गहाण ठेवून या व्यापाऱ्याला दहा लाख रुपये दिल्याचा दावा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हे निवेदन जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून सोनई पोलीस ठाण्यात दोन महिन्यांपूर्वी आलं आहे. मात्र या संदर्भात सोनई पोलिसांनी अद्यापपर्यंत संबंधित व्यापारी आणि त्याच्या सहकारी मित्राविरुद्ध कुठलीही कारवाई केलेली नाही. त्यामुळे सोनईचे पोलीस नक्की काय करताहेत, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

Advertaismentspot_img

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

महत्वाच्या घडामोडी