Wednesday, April 30, 2025

सोनईतल्या ‘कोयता गॅंग’च्या आरोपींच्या शोधार्थ पोलीस पथकं रवाना…! स्थानिक पोलिसांची माहिती…!

लोकपत डिजिटल मीडिया / अहिल्यानगर

नेवासे तालुक्यातल्या सोनई- कांगोणी रस्त्यावरच्या गजबजलेल्या छत्रपती चौकात दि.  27 च्या रात्री साडेआठ वाजण्याच्या दरम्यान कोयता गॅंगनं केलेल्या हल्ल्यात अक्षय बाळासाहेब शेटे पाटील हा सामाजिक कार्यकर्ता असलेला तरुण जखमी झालाय. सोनई पोलिसांच्या सूचनेवरुन त्याच्यावर अहिल्यानगरच्या एका खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले.  दरम्यान,  या ‘कोयता गॅंग’ची दहशत वाढत असून पोलीस प्रशासनाने हा विषय गांभीर्याने घेण्याची आवश्यकता आहे.

या संदर्भात सोनई पोलीस ठाण्यात चौकशी केली असता ‘कोयता गॅंग’च्या या आरोपींच्या शोधार्थ पोलीस पथकं रवाना करण्यात आली असल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिलीय. अक्षय बाळासाहेब शेटे पाटील

(वय२७) हे त्यांच्या घराकडे जात होते. त्यावेळी रस्त्यावर एका महिलेला अपघात झाला होता. संबंधित व्यक्तीला यामध्ये तुझी चूक आहे, तु त्यांची माफी माग’, असं म्हणाले.

याचा आरोपीला राग आल्याने ‘तु इथुन निघून जा. नाही तर तुझ्याकडे बघतो’,  असा दम दिला. त्यानंतर रात्री ८.३० वाजता शेटे पाटील हे त्यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी येथील छत्रपती चौकात दुचाकीवर मित्रांसोबत बसलेले होते. अशातच त्या ठिकाणी आरोपी संजय उर्फ गोंड्या नितीन वैरागर, सौरभ उर्फ शेंग्या अशोक गजभिव, अमोल साप्ते, आणि एक अनोळखी इसम (सर्व रा. सोनई) हे दुचाकीवरुन हातात कोयता घेऊन आले.

अक्षय शेटे पाटील यांना शिवीगाळ करत ‘तु आर. जे. कंपनीला नडला आहेस. तुला आता सोडत नसतो’, असं म्हणत सोबत आणलेल्या कोयत्याने जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने हातावर, खांद्यावर वार करत जखमी केले.

अशा अवस्थेत फिर्यादी हे त्या ठिकाणाहून जात असताना शिवीगाळ करत तुला आता जीवंत सोडत नसतो, असा दम दिला. दि. २८ रोजी सोनई पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल आला. घटनेचं गांभीर्य लक्षात घेत शेवगाव विभागाचे पोलीस उपविभागीय अधिकारी सुनील पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी तसेच पोलीस उपनिरीक्षक सुरज मेढे यांनी घटना स्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी गुन्हा रजिस्टर नंबर र. नं. १६४/२०२५ बिएनएस चे कलम १०९(१),३५२, ३५१(२) (३), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय माळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुरज मेढे हे करत आहेत.

सोनई पोलीस या आरोपींची धिंड काढणार का?

सोनईसारख्या शांत आणि परस्परांमध्ये एकोपा असलेल्या गावात कोयता गॅंगच्या या असल्या भ्याड हल्ल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित झाला आहे. विशेष म्हणजे या कथित कोयता गॅंगच्या तरुणांकडून ज्या महिलेला दुचाकीची धडक बसली, त्याच महिलेला हे तरुण मोबाईल फुटला, असं म्हणत तिला पैसे मागत होते, दमदाटी करत होते. गुन्हेगारीमध्ये वाढ होण्याआधी आणि पोलिसाच्या धाक बसावा, यासाठी सोनई पोलीस या आरोपींची धिंड काढणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

कोयता गॅंगची दहशत वाढते आहे…! 

कायदा आणि पोलिसांचा धाक नसल्यामुळे अशा तरुणांची हिंमत दिवसेंदिवस वाढत आहे. यातल्या काही तरुणांनी यापूर्वी एका चष्मा विक्रेत्याला दमबाजी करत त्याच्याकडून दहा हजार रुपये उकळले होते, असंही ऐकायला मिळत आहे. या कोयता गॅंगच्या आरोपींना नक्की कोणाचा वरदहस्त आहे, या तरुणांना कोण पाठीशी घालत आहे, या प्रश्नाचा विचार करण्याची नितांत आवश्यकता आहे.

Advertaismentspot_img

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

महत्वाच्या घडामोडी