लोकपत न्युज नेटवर्क / अहिल्यानगर
हल्ली इलेक्ट्रॉनिक आणि सोशल मिडियाला प्रचंड मागणी आहे. आजकाल प्रत्येक जण सोशल मिडियामध्ये गुरफटून गेला आहे. जगभरातल्या बातम्या सर्वांना मोबाईलवर एका क्षणात पाहायला वाचायला मिळताहेत.
जगभरात घडणाऱ्या विविध प्रकारच्या घटना प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याचं काम सोशल मिडिया करत असतो. या भौतिक घटनांबरोबरच परमार्थाच्या क्षेत्रातल्या घटनांचं वार्तांकन करण्याबरोबरच सोशल मिडियानं संतांच्या विचारांचा प्रचार – प्रसार करण्याचं काम करावं, अशी अपेक्षा नेवासे तालुक्यातल्या श्रीक्षेत्र संत ज्ञानेश्वर संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प. देविदास महाराज म्हस्के यांनी व्यक्त केलीय.
‘लोकपत’ या ऑनलाईन बातमीपत्राचा छोटेखानी लोकार्पण सोहळा संत ज्ञानेश्वर मंदिरात आज (दि. २२) पार पडला. संपादक बाळासाहेब शेटे पाटील यांनी प्रारंभी ह. भ. प. म्हस्के महाराजांना या उपक्रमाविषयी माहिती दिली. ‘लोकपत’ या ऑनलाइन बातमीपत्राचं औपचारिक उद्घाटन झाल्यानंतर हभप देविदास महाराज म्हस्के यांनी पुढील वाटचालीसाठी या संस्थांच्यावतीनं ‘लोकपत’ न्युज नेटवर्क परिवाराला शुभेच्छा दिल्या.