लोकपत डिजिटल मीडिया / अहिल्यानगर
नेवासे तालुक्यातल्या सोनईनजिक असलेल्या हनुमानवाडी परिसरात हनुमान जन्मसोहळ्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाची मोठ्या उत्साहात सांगता झाली. हभप मंडलिक महाराजांचं यावेळी काल्याचं कीर्तन झालं. दरम्यान, काल (दि. १२) रात्री नऊ ते अकराच्या दरम्यान, महाराष्ट्रातले प्रसिद्ध कीर्तनकार हभप मच्छिंद्र महाराज निकम यांची कीर्तन सेवा आयोजित करण्यात आली होती. या सेवेत बोलताना हभप निकम महाराज यांनी समाजातल्या ढोंगी लोकांवर टीकास्त्र सोडलं.
यासंदर्भात हभप निकम महाराज यांनी एका जुन्या प्रसंगाची आठवण करुन देत अंगात येणाऱ्या एका इसमाला कशा पद्धतीने ह भ प निकम महाराज यांनी धडा शिकवला होता, याविषयी त्यांनी उपस्थितांना विनोदी शैलीत तो जुना किस्सा ऐकाविला. त्यानंतर उपस्थित महिला आणि पुरुषांमध्ये अक्षरशः हास्याचे फवारे उडाले.
हनुमान कला, क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळाच्यावतीनं आयोजित करण्यात आलेल्या या अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचा पंचक्रोशीतल्या शेकडो भाविकांनी लाभ घेतला. काल्याच्या किर्तनप्रसंगी भाजपचे युवा नेते ऋषिकेश शेटे पाटील, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश शेटे पाटील यांच्यासह अनेक भाविक उपस्थित होते.