Thursday, January 23, 2025

उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या हस्ते ‘पंचगंगा’चा उद्या भव्य शुभारंभ…!

लोकपत न्यूज नेटवर्क / अहिल्यानगर / प्रतिनिधी

बहुचर्चित पंचगंगा उद्योग समूह संचलित पंचगंगा शुगर अँड पॉवर प्रायव्हेट लिमिटेडच्या पंचगंगा साखर कारखान्याच्या प्रथम गळीत हंगामाचा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे

यांच्या हस्ते उद्या अर्थात सोमवारी (दि. २३) दुपारी 12 वाजून पाच मिनिटांनी भव्य असा शानदार शुभारंभ होत आहे, अशी माहिती कारखान्याचे चेअरमन प्रभाकर काका शिंदे

यांनी दिलीय.

देवगड संस्थानचे मठाधिपती गुरुवर्य भास्करगिरी महाराज,

गोदाधामचे मठाधिपती गुरुवर्य रामगिरीजी महाराज

आणि देवगड संस्थांचे उत्तराधिकारी प्रकाशानंद गिरीजी महाराज यांच्या शुभ आशिर्वादानं होत असलेल्या या महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या शुभारंभप्रसंगी राज्याचे जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखे,

छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपान भुमरे,

कॅबिनेट मंत्री संजय शिरसाठ, कॅबिनेट मंत्री अतुल सावे, आमदार रमेश बोरनारे, आमदार प्रशांत बंब, आमदार शिवाजीराव कर्डिले,

आमदार रोहित आर. आर. पाटील,

नेवाशाचे आमदार विठ्ठलराव लंघे

आदी उपस्थित राहणार आहेत.

वैजापूर तालुक्यातल्या महालगाव इथं होत असलेल्या कार्यक्रमास छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, विशेषतः नेवासे तालुक्यातल्या लाखो शेतकरी बांधवांनी उपस्थित रहावं, असं आवाहन चेअरमन प्रभाकर काका शिंदे, कुंडलिकराव माने पाटील, चार्टर्ड अकाऊंट भाऊराव गायकवाड आणि पंचगंगा शुगर अँड पॉवर प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालक मंडळाच्यावतीनं करण्यात येत आहे.

Advertaismentspot_img

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

महत्वाच्या घडामोडी