Wednesday, January 22, 2025

अहिल्यानगरच्या सबजेलमध्ये कैद्यांना शाही वागणूक…! आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्यायिक परिषदेचे जिल्हाध्यक्ष अमोल कोठारी यांचा आरोप…! एस पी राकेश ओला यांना दिलं निवेदन…!

लोकपत न्यूज नेटवर्क/ अहिल्यानगर / प्रतिनिधी 

‘अर्थपूर्ण’ संगनमतानं निरोगी कैद्यांची शाही बडदास्त ठेवणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांसह सिव्हील हॉस्पिटलच्या गार्डविरुद्ध योग्य ती कारवाई करा, अशा आशयाचं निवेदन आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्याय परिषदेचे जिल्हाध्यक्ष अमोल कोठारी

यांनी अहिल्यानगरचे एसपी राकेश ओला यांना दिलंय. 

कोठारी यांनी या निवेदनामध्ये म्हटलंय, की मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार सबजेलचे पोलीस कर्मचारी, पोलीस मुख्यालयाचे कर्मचारी, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेमणूक असलेले गार्ड आर्थिकदृष्ट्या ‘गब्बर’ असे सबजेलमध्ये बंदीवान कच्चे आणि पक्के कैदी यांच्या ‘अर्थपूर्ण’ संगनमतानं निरोगी कैद्यांना आजारी असल्याचं भासवून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं जातं. त्यानंतर या कैद्यांना दारू, मटण, घरचं जेवण, घरच्यांशी वारंवार भेटण्याची संधी हे सार उपलब्ध करून दिले जातं.

हा सर्व प्रकार खूपच गंभीर आणि तितकाच चिंताजनक आहे. कायदा हा सर्वांना समान आहे, असं नुसतं म्हटलं जातं. मात्र त्या कायद्याची अंमलबजावणी करताना ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष करत आर्थिक परिस्थिती हलाखीची असलेल्या कायद्यांकडे जाणीवपूर्वक डोळेझाक केली जाते. यासाठी जे जे जबाबदार असतील त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी.

यासंदर्भात जिल्हाधिकारी, अहिल्यानगर, उपकारागृह अधीक्षक, अहिल्यानगर, विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र, नाशिक, संपादक, लोकपत न्युज नेटवर्क अहमदनगर, सर्व वृत्तपत्र आणि वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी, अहिल्यानगर आणि सोशल मिडियाचे प्रतिनिधी आदींना निवेदन देण्यात आलं आहे.

बातम्या आणि जाहिरातींसाठी संपर्क 

मोबाईल नंबर 

70 28 35 17 47

Advertaismentspot_img

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

महत्वाच्या घडामोडी