लोकपत न्यूज नेटवर्क / अहिल्यानगर
‘बाप से बेटा सवाई’ ही प्रचलित म्हण दैनंदिन व्यवहारात आपल्याकडे नेहमी वापरले जाते. या म्हणीचा जन्म कधी झाला, याविषयी कोणालाही नक्की सांगता येणार नाही. मात्र ही म्हण खरी करून दाखवण्याची किमया अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ यांचा मुलगा रोहित यांना करून दाखवली आहे. रॅपिड फायर प्रकारात पुण्याचे प्रतिनिधित्व करत असताना रोहित वाघ यानं अव्वल कामगिरी केली आहे.
दरम्यान, पंजाबच्या चंदीगड इथं होणाऱ्या ऑल इंडिया इंटर यूनिवर्सिटी शूटिंग स्पर्धेसाठी रोहित वाघ याची निवड झाली आहे.
रोहित वाघ सध्या सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड मास कमुनिकेशनमध्ये एमबीएच्या प्रथम वर्षात शिकत आहे. यापूर्वी रोहित वाघ यानं पुण्यातल्या बालेवाडी शूटिंग रेंज इथं झालेल्या विभागीय स्पर्धेत चौथे स्थान मिळवलं होतं. त्यापूर्वी रोहित वाघनं तामिळनाडू इथं पार पडलेल्या 33 व्या ऑल इंडिया जी. व्ही. मावळणकर शूटिंग स्पर्धेत 50 मीटर प्रकारात कांस्यपदक स्पर्धक मिळविलं होतं.
नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियातर्फे (एन आर ए आय) नवीदिल्ली इथं डॉक्टर करणसिंग शूटिंग रेंजवर होणाऱ्या 67 व्या स्पर्धेत रोहित वाघ सहभागी होणार आहे.
दरम्यान, रोहित वाघ हा शिवछत्रपती पुरस्कार विजेते शिवराज ससे आणि सविता मताने यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या वाटचाल करत आहे.
सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे अध्यक्ष प्राध्यापक डॉ. संजय बी. चोरडिया, उपाध्यक्ष सुषमा चोरडिया यांच्यासह तमाम विद्यार्थ्यांनी रोहित वाघ याचं या कामगिरीबद्दल अभिनंदन करत त्याच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.