Wednesday, January 22, 2025

‘पंचगंगा’च्या ऊस नोंदीवर मिळणार आता पीक कर्ज…! जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनी परिपत्रकाद्वारे दिला आदेश…! 

लोकपत न्यूज नेटवर्क / अहिल्यानगर

नेवासा तालुक्यातल्या ऊस उत्पादकांची आता आणखी एक चिंता मिटली आहे. आता कुठल्याही शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी कोणीही अडवणूक करणार नाही. आता नेवासा तालुक्यातील कोणत्याही बँकेत किंवा कोणत्याही विविध कार्यकारी सोसायटीमध्ये पंचगंगा शुगर अँड पावर लिमिटेड, महालगाव या कारखान्यास नोंद असलेल्या ऊसाला नोंद सर्टिफिकेटवर शेती कर्ज मिळण्यास काही अडचण राहिलेली  नाही.

यासंदर्भात अहमदनगर डिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव्ह बँकेनं परिपत्रक काढून कळवण्यात आले. आता सर्व बँका, सोसायटीमध्ये पंचगंगा शुगर अँड पावर या साखर कारखान्यात नोंदविलेल्या ऊसाच्या सर्टिफिकेटवर शेती कर्ज मिळणार असल्याचे नुकतेच जिल्हा बँकेकडून परिपत्रक काढण्यात आले.

जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांची पंचगंगाचे अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी नुकतीच भेट घेऊन याविषयी माहिती दिली होती. त्यानंतर लगेचच आदेश काढण्यात आले. या भेटीप्रसंगी राजू मते, सतीश कर्डिले, प्रताप काका चिंधे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Advertaismentspot_img

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

महत्वाच्या घडामोडी