लोकपत न्यूज नेटवर्क / अहिल्यानगर
अहिल्यानगर भूमी अभिलेख कार्यालयाचे अनेक कारनामे उघडकीला येत आहेत. या कार्यालयाचे तत्कालीन अधिक्षक गजानन पोळ यांच्या कार्यकाळात तर याचा कळस झाला होता. या कारनाम्याचा कळस झाल्यानं सर्वसामान्य शेतकरी, बांधकाम व्यावसायिक आणि महत्त्वाच्या कामासाठी या कार्यालयाचे उंबरठे झिजविणाऱ्या नागरिकांना या कारनाम्यांची आता अक्षरशः किळस वाटू लागली आहे.
सध्या या कार्यालयात महत्त्वाची जबाबदारी सांभाळत असलेले अविनाश मिसाळ हे तर बेजबाबदार अधिकाऱ्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणावं लागेल. मिसाळ यांच्या अवतीभवती वावरणाऱ्या एजंटांवर आता बाहेरच्या जिल्ह्यातल्या अधिकाऱ्यांनी करडी नजर ठेवावी, अशी तर मिसाळ यांना अपेक्षा नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे. रवी नावाचा एक मोजणी अधिकारी आणि चार ते पाच एजंटांची टोळी जमीन मोजणीच्या नावाखाली नागरिकांकडून लाखो रुपये उकळत असताना अविनाश मिसाळ हे इतके अनभिज्ञ कसे, हा कदाचित संशोधनाचा विषय ठरु शकतो.
दरम्यान, अहिल्यानगरच्या भूमी अभिलेख कार्यालयाकडून नगर – सोलापूर या राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनामध्ये मोजणी आणि भूसंपादन प्रक्रियेत प्रचंड ‘आर्थिक’ तडजोड केल्याची जोरदार चर्चा आहे. विशेष म्हणजे सामान्य शेतकऱ्यांना तर अजून या प्रकाराची कल्पनादेखील नाही.
भूसंपादन प्रकिया शासकीय मोजणी आणि राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन प्रकिया आणि भूमी अभिलेख कार्यालयाचं कार्य अंत्यंत महत्त्वाचं काम कार्य आहे. परंतू यात या अहिल्यानगर भूमी अभिलेख कार्यालयाने ब्रिटिश काळापासून जी मोजणी प्रकियेची पध्दत अवलंबविली आहे, त्या पध्दतीनुसार आणि कागदाप्रमाणे तसंच जुन्या अभिलेखप्रमाणे काम करणं आवश्यक असताना यात अनेक ठिकाणी गोंधळ घातला गेला आहे.
हा गोंधळ ना नजर चुकीने झालेला ना तांत्रिक बाबीमुळे. तो गोंधळ फक्त आणि फक्त ‘लक्ष्मी दर्शना’नेच झालेला आहे. नगर – सोलापूर राष्ट्रीय क्रमांक ५१६ अ मध्ये तर चक्क अनेकांना ‘लक्ष्मी दर्शन’ घडवल्यानं दुरुस्ती अहवालही देण्यात आलाय. काही क्षेत्र कमी – जास्त दाखवले गेले.
काही क्षेत्र लागत आहे, ते कागदोपत्री या महामार्गात घुसवले गेले आहे. यातल्या मोजणी शीटवर मोजणी केली तर ती कुठेही जुळत नाही. दहिगावमधील मोजणी शीट क्रमांक दोनमध्ये तर मोठा गोंधळ घातला गेला आहे. श्री राम देवस्थानचा समावेश राष्ट्रीय गट क्रमांक ७६ मध्ये तसेच महामार्ग भूसंपादन गावठाणमध्ये अर्धा हिस्सा दाखवला आहे.
श्रीराम देवस्थानचं हे मंदीर जागा बदलत आहे का, हाच खरा प्रश्न आहे. दोन-चार वर्षांतून जुनी घरं, जमीन यातदेखील गोंधळ घातला गेला आहे. प्रत्यक्षात जास्त क्षेत्र गेले असताना संबंधितांना कमी मोबदला दिल्या गेल्याच्या आहेत. भूमी अभिलेख मोजणीमुळे हा गोंधळ करण्याचं प्रमुख कारण आहे.
जर उद्या हा विषय न्यायालयात जरी गेला तरी संबंधित अधिकारी सेवानिवृत्त झाल्यावरही या प्रकरणाचा निकाल लागेल की नाही, ही शंकाच आहे. हा दावा दिवाणी दाव्यामध्ये मोडत असल्याने या केसेस खूप संथ गतीने चालतात. ‘लक्ष्मी दर्शन’च्या लालसेमुळे जो बदल, जी दुरुस्ती करावी लागते, तो रेट ठरला केव्हाच ठरला आहे.
दहिगाव जागा अतिक्रमण हद्द, ग्रामपंचायत हद्द आणि शेती हद्द असं एक प्रकरण छत्रपती संभाजीनगर खंडपीठात दाखल झालं आहे. हे प्रकरण दाखल होऊन जवळपास दोन वर्षे झाले. तरीही ते रेकार्डवर आलं नाही. हे खंडपीठात केसेस प्रोसेस दोन वर्षे अजून ते रेकार्डवर आले नाही. मग ते तारीख, जबाब, पंचनामा, मोजणी अहवाल अशा अनेक गोष्टी झाल्यावर पुढे केस तारखा सुरु होणार. अहिल्या नगरच्या भूमी अभिलेख कार्यालयाविषयी अनेक तक्रारी आल्या असून त्या तक्रारींची स्वतंत्र बातमी आम्ही तुम्हाला यापुढे सातत्यानं देण्याचा प्रयत्न करणार आहोत.