लोकपत न्यूज नेटवर्क / बीड / प्रतिनिधी
बीड जिल्ह्यातल्या केज तालुक्याच्या मस्साजोग ग्रामपंचायतीचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या आणि खंडणी प्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या विष्णू चाटे याने मोठी कबुली दिली आहे. पवनचक्की कंपनीला दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची विचारणा वकील यांनी केली असता साठे याने ‘हो’, असं उत्तर दिलं आहे. दरम्यान, चाटे याच्या या होकारार्थी उत्तराने वाल्मीक कराडच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे.
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीने सुरू केला आहे. पोलिसांना शरण आलेला वाल्मिक कराड याला पंधरा दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. कराड यानं पवनचक्की कंपनीच्या अधिकाऱ्यांशी फोनवर संभाषण केलं होतं, असंही चाटे याने चौकशी दरम्यान सांगितलंय.
31 डिसेंबर रोजी वाल्मीक कराड यानं पुण्यातल्या सीआयडी पोलिसांसमोर शरणागती पत्करली. न्यायालयाने पंधरा दिवसांसाठी त्याची पोलीस कोठडीत रवानगी करण्याचे आदेश दिले. सुरुवातीला दोन दिवस कराड याने जेवण घेण्यास नकार दिला. पोलीस अधिकाऱ्यांनी आग्रह केल्यानंतर त्याने जेवण केले.
दरम्यान, या गुन्ह्याच्या चौकशीप्रकरणी एखाद्या मंत्र्यामुळे अडचणी येत असतील तर सरकारने योग्य पावलं उचलावीत, असं वक्तव्य खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केलं आहे. डॉ. कोल्हे म्हणाले, ‘या प्रकरणावर लोकांचा रोष आहे. सरकारने हा रोष लक्षात घ्यायला हवा. या गुन्ह्यामध्ये कोणालाही पाठीशी न घालता ‘दूध का दूध पानीज्ञका पानी’ केलं पाहिजे.