लोकपत डिजिटल मीडिया न्यूज / अहिल्यानगर
अहिल्यानगर जिल्ह्याचे एसपी राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना जिल्ह्यामधील अवैध व्यावसायिकांची माहिती काढून कारवाई करणेबाबत आदेश दिलेले आहे. नमूद आदेशाप्रमाणे पोनि. आहेर यांनी अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या तपास पथकातले पोलीस अंमलदार गणेश लोंढे, बाळसाहेब नागरगोजे, किशोर शिरसाठ, अशोक लिपणे, शिवाजी ढाकणे, विशाल तनपुरे आणि रणजीत जाधव यांचं पथक तयार करुन अवैध धंदयाची माहिती काढून कारवाई करण्याबाबत सूचना देऊन हे पथक रवाना केलं.
आज दिनांक 10/04/2025 रोजी या पथकाने शेवगाव आणि नेवासा पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या इसमांची बातमीदारामार्फत माहिती काढून पंचांसमक्ष 02 वेगवेगळया ठिकाणी छापे टाकुन कारवाई केली. या पथकाने केलेल्या कारवाईमध्ये शेवगाव आणि नेवासा पोलीस स्टेशनला अवैध वाळू वाहतुक करणाऱ्यांविरूध्द आरोपींविरूध्द गुन्हे दाखल करण्यात आले.
या कारवाईत 22 लाख 70 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईत अटक केलेला मुद्देमाल आणि आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत : शेवगाव गुन्हा रजिस्टर नंबर 321/2025 बीएनएस 303 (2), (5) 5,10,000/- रू किं.त्यात 1 ट्रॅक्टर व वाळू 1. संतोष प्रभाकर औवसरमल, रा.कोरडगाव, ता.पाथर्डी
2. निखील राजेंद्र काकडे, रा.कोरडगाव, ता.पाथर्डी (फरार)
2 नेवासा गुरनं 362/2025 बीएनएस 303 (2),
3 (5) 17,60,000/- रू किं.त्यात 1 डम्पर, 1 टेम्पो व वाळु 1. गोरख दत्तु लष्करे, रा.नेवासा, ता.नेवासा
2. सुहास ज्ञानेश्वर लष्करे, रा.नेवासा, ता.नेवासा (फरार)
3. सागर केशव लष्करे, रा.नेवासा, ता.नेवासा
4. योगेश उत्तम बोडखे, रा.नेवासा, ता.नेवासा
5. पप्पु उर्फ विश्वास पटारे, रा.भालगाव, ता.नेवासा (फरार)
सदरची कारवाई राकेश ओला, जिल्हा पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर, सुनिल पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगाव उपविभाग यांच्या सुचना आणि मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांनी केली.
नेवासा आणि शेवगावचे पोलीस झोपा काढताहेत का?
अहिल्यानगर एलसीबीने नेवासा आणि शेवगाव तालुक्यात केलेल्या या धडाकेबाज कामगिरीमुळे स्थानिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जे काम एलसीबीच्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना करता आलं, ते काम स्थानिक पोलिसांना का करता आलं नाही? स्थानिक पोलिसांचे ‘खबरे’ नक्की काय करत आहेत? शेवगाव आणि नेवासा पोलिसांकडे डीबी पथक नाही का? अवैध वाळूच्या धंद्याची माहिती नगर एलसीबीच्या पोलिसांना समजते. मग नेवासा आणि शेवगावचे पोलीस झोपा काढत आहेत का, असा प्रश्नदेखील यानिमित्तानं उपस्थित होत आहे.