Saturday, April 26, 2025

हवेत उडणारी कार पहायची असेल तर ही बातमी नक्की वाचा…!

खाली दिलेली लिंक ओपन करा आणि उडत्या कारचा व्हिडिओ पहा…!

https://x.com/CollinRugg/status/1892975716620263893?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1892975716620263893%7Ctwgr%5E491004aec6c6b8134eb48ec1e13cbe44b512294e%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=http%3A%2F%2Fapi-news.dailyhunt.in%2F

लोकपत न्यूज नेटवर्क / नवीदिल्ली

ही रस्त्यावर धावू शकते आणि हवेत उडू शकते. व्हिडिओमध्ये दाखवलेले मॉडेल एक प्रोटोटाइप आहे, ज्याला “अलेफ मॉडेल झिरो” म्हणतात. ट्रायल रननंतर कंपनी व्यावसायिक मॉडेल लाँच करण्याच्या तयारीत आहे. या कारमध्ये दोन लोकांसाठी बसण्याची व्यवस्था असेल असे सांगण्यात येत आहे. तसेच, त्याची फ्लाइंग रेंज 110 मैल असेल तर रस्त्यावर ड्रायव्हिंग रेंज 200 मैल असेल. ही कार ऑटोपायलट मोडवरही उडू शकते.

कॅलिफोर्नियातील सुरक्षित आणि बंद रस्त्यावर या कारची टेस्टिंग करण्यात आली. व्हिडिओमध्ये दाखवण्यात आले आहे की, प्रथम ही कार एखाद्या सामान्य कारप्रमाणे रस्त्यावरून जात होती, नंतर अचानक ती वर आली आणि समोर उभ्या असलेल्या कारला मागे टाकत अवकाशात उडू लागली. ही अशी घटना जगात पहिल्यांदाच घडली असावी. भविष्यात ट्रॅफिक जाम टाळण्यासाठी ही कार उत्तम पर्याय ठरू शकते, असा कंपनीचा दावा आहे. हा प्रकल्प विमान वाहतूक आणि वाहन उद्योगासाठी एक मोठी उपलब्धी मानली जात आहे.

जर एखाद्याला ही कार खरेदी करायची असेल तर त्याला फक्त 13,000 रुपये बुकिंग रक्कम जमा करावी लागेल, असे सांगण्यात येत आहे. मात्र, या कारची अंदाजे किंमत 2.5 कोटी रुपयांपेक्षा जास्त असू शकते. आत्तापर्यंत Aleph कंपनीला 3,300 हून अधिक प्री-ऑर्डर मिळाल्या आहेत, ज्यावरून लोक या कारबद्दल खूप उत्सुक असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. ही कार ताशी 40 किलोमीटर वेगाने रस्त्यावर धावू शकते आणि गरज पडल्यास सरळ वर उडू शकते.

Advertaismentspot_img

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

महत्वाच्या घडामोडी