Tuesday, June 17, 2025

वाल्मीक कराड पुरता अडकणार? दुसऱ्या सुनावणीत ॲड. उज्वल निकम यांची तुफान ‘बॅटिंग’…!

लोकपत डिजिटल मीडिया / बीड 

बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग ग्रामपंचायतीचे स्व. सरपंच संतोष देशमुख

हत्याकांडातला कागदोपत्री पुरावा, सायंटिफिक पुरावा, किडनॅप केलं, तेव्हा फिर्यादीनं केलेलं वर्णन, प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, परिस्थितीजन्य पुरावा असे पुरावे या खटल्यामध्ये असल्याचं बोललं जातंय. याव्यतिरिक्त सुदर्शन घुले, महेश केदार, जयराम चाटे या तीन आरोपींनी गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली आहे. यातून वाल्मिक कराड पुरता अडकणार, असं सांगण्यात येतंय.

सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणाच्या सुनावणीने न्यायालयात वेग धरलाय. दुसऱ्या सुनावणीत ॲड. उज्ज्वल निकम

यांनी तुफान बॅटींग करत संतोष देशमुख हत्याप्रकरणात मोठा ट्विस्ट आणलाय. त्यांनी वाल्मिक कराडच या कटातला मास्टरमाईंड आहे, सिद्ध करण्यासाठी 3 पुरावे सादर केलेत.. त्याचबरोबर 3 आरोपींनीही आपले गुन्हे कबुल करत वाल्मिक कराडच्या अडणची वाढवल्यात.. ते 3 आरोपी कोण? त्यांचे कबुली जवाब काय? ते जाणून घेण्याआधी उज्ज्वल निकमांनी न्यायालात कोणते पुरावे सादर केले आहेत, ते पाहू.

उज्ज्वल निकमांनी सरपंच संतोष देशमुखांची हत्या हा मोठ्या कटाचा परिपाक दावा न्यायालयात केला. हा कट रचला गेला? याचा सगळा लेखाजोगाच निकमांनी तारखांसहीत न्यायालयासमोर मांडला. सुदर्शन घुले हा गॅंगचा लिडर आहे आणि त्याला वाल्मिक कराडनेच गाईड केल्याचा दावा निकमांनी केला. सुरुवातील आवादा कंपनीच्या वॉचमनला सुदर्शन घुलेनेच मारहाण केली असा युक्तिवाद उज्ज्वल निकम यांनी केला. म्हणजे संतोष देशमुखांना मारणाऱ्या टोळीचा म्होरक्या सुदर्शन घुले होता. आणि सुदर्शन घुले वाल्मिकच्या सांगण्यावरून खंडणी मागायला गेला होता. याबाबतचे पुरावे असल्याचा दावा निकमांनी केला आहे.

 8 ऑक्टोबर 2024 ला वाल्मिक कराडच्या जगमित्र कार्यालयात विष्णू चाटे आणि वाल्मिक कराडची एक बैठक झाली. याच बैठकीत आवादा कंपनीकडून 2 कोटींची खंडणी मागण्याचं निश्चित झालं. यासाठीच तिथं आवादा कंपनीचे अधिकारी शिवाजी कोकाटेंना बोलवण्यात आलं.. आणि त्यांना वाल्मिक कराडने प्रत्यक्ष खंडणीची धमकी दिली.

यानंतर 9 ऑक्टोबरला कोकाटेंनी कंपनीतल्या वरिष्ठांना कळवलं.. दिल्लीतल्या वरिष्ठांनी त्यांना तक्रार करु नका.. असा सल्ला देण्यात आला.. यानंतर 26 नोव्हेंबर 2024 ला सुदर्शन घुले कंपनीत गेला. त्याने पुन्हा शिवाजी कोकटेंना धमकी दिली. वाल्मिक कराड सांगतोय ते ऐकून घेण्यासाठी त्यांच्यावर दादागिरी केली. दरम्यान, उज्वल निकमांनी सादर केलेले हे 3 पुरावे आणि 3 आरोपींनी कबुल केलेले आरोप यावरून वाल्मिक कराडला फिक्स फाशी मिळणार का, अशा चर्चा ऐकायला मिळत आहेत.

Advertaismentspot_img

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

महत्वाच्या घडामोडी