Sunday, June 15, 2025

अहिल्यानगरच्या भुईकोट किल्ल्यात संतापजनक प्रकार…! लष्करातल्या दोघांनी केलं महिलेचं लैंगिक शोषण…! दोघांच्या अटकेसाठी गेलेल्या पोलिसांना लष्कराच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अपमानास्पद वागणूक…!

लोकपत डिजिटल मीडिया / अहिल्यानगर

अहिल्यानगरच्या भुईकोट किल्ल्यात असलेल्या लष्कराच्या सप्लाय डेपो विभागात (58 Coy asc supply Depo type B) ड्युटीवर तैनात असलेल्या सुभेदार एस. के. रेड्डी आणि हवालदार वैशाख ओपी या दोघांविरुद्ध एका 36 वर्षीय महिलेचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या दोघांनी सदर महिलेच्या पतीला ठार मारण्याची धमकी देत या महिलेशी तिच्या इच्छेविरुद्ध वेगवेगळ्या ठिकाणी शारीरिक संबंध ठेवले असल्याचं भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात देण्यात आलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

दरम्यान, या दोघांना अटक करण्यासाठी गेलेल्या भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना भुईकोट किल्ल्यात असलेल्या सप्लाय डेपोच्या अधिकाऱ्यांनी कुठलंही सहकार्य केलं नाही. या दोघा नराधमांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला असल्याचं तपास अधिकाऱ्यानं खासगीत बोलताना सांगितलंय. या प्रकरणाचा पंचनामा करायला गेलेल्या पोलिसांचे मोबाईल तिथल्या लष्करी अधिकाऱ्यांनी काढून घेतल्याची धक्कादायक माहिती या अधिकाऱ्यानं सांगितली.

हवालदार वैशाख ओपी या लिंगपिसाट अधिकाऱ्यानं दि. 27. 1. 2024 आणि दि.  3. 2. 2024 रोजी भिंगारच्या विजयनगर चौकात असलेल्या गुलाबी रंगाच्या श्रेयस अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावरच्या वेगवेगळ्या फ्लॅटमध्ये सदर महिलेच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याचंही या फिर्यादीत म्हटलं आहे. लष्कर आणि त्यात काम करणारे अधिकारी आणि जवान हे सर्वसामान्य भारतीयांच्या सुरक्षेसाठी असतात. मात्र रक्षकच भक्षक झाल्याचं याठिकाणी पहायला मिळत आहे.

लिंगपिसाट सुभेदार एस. के. रेड्डी आणि हवालदार वैशाख ओपी या दोघांनी अहिल्यानगरच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयात वकिलामार्फत अटकपूर्व जमिनीसाठी अर्ज केला आहे. दि. 9 एप्रिल म्हणजे उद्या त्यावर सुनावणी होणार आहे. या दोघांविरुद्ध अत्यंत गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. या संपूर्ण प्रकरणाचा तपास अद्याप बाकी आहे. त्यामुळे या दोघांना अटक केल्याशिवाय या गंभीर प्रकरणाचा पुढील तपास करणं पोलिसांना अशक्य आहे. या पार्श्वभूमीवर भिंगार कॅम्प पोलीस नक्की काय भूमिका घेणार, या दोघांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला जाणार का, सदर पिडित आणि अत्याचारित महिलेला न्याय मिळणार का, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं अद्याप तरी अनुत्तरितच आहेत.

लिंगपिसाट सुभेदार आणि हवालदाराला फाशीची शिक्षा द्या…! 

महाराष्ट्रात अनेक ठिकाणी महिला अत्याचाराची प्रकरणं उजेडात येत आहेत. सरकारी कार्यालयामध्ये महिलांचं लैंगिक छळ केल्याच्या घटना यापूर्वी अनेकवेळा घडलेल्या आहेत. भारतीय लष्करात महिला सुरक्षित असल्याचं चित्र आतापर्यंत पाहायला मिळत होतं. मात्र या घटनेवरुन  भारतीय लष्करातसुद्धा महिला सुरक्षित नाहीत, हे वास्तव आहे. या घटनेतल्या पीडित अत्याचारित महिलेनं या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल होण्यासाठी राज्य महिला आयोगाकडे धाव घेतली होती. या महिलेला न्याय मिळावा, यासाठी संबंधित लिंगपिसाट सुभेदार आणि हवालदाराला फाशीची शिक्षा ठोठावण्यात यावी, अशी अपेक्षा तमाम महिला वर्गातून केली जात आहे.

Advertaismentspot_img

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

महत्वाच्या घडामोडी