Wednesday, January 22, 2025

59 हजार रुपयांचा मोबाईल फक्त 29 हजार रुपयांना…! कोणती कंपनी? कुठं मिळतो? जाणून घेण्यासाठी वाचा की सविस्तर बातमी…!

लोकपत न्यूज नेटवर्क / नवीदिल्ली 

हल्ली मोबाईल वाचून जगणं, अनेकांना अशक्य झालं आहे. मोबाईल जर नसेल तर खूप काही हरवल्यासारखं वाटतं. मोबाईलचा रिचार्ज संपला तरी खूप बेचैनी वाढते. कारण बरीचशी काम मोबाईलच्या आधारे होत आहेत. सोशल मीडियामध्ये अनेक पोर्टल आणि यूट्यूब चॅनलचं कामकाज हे मोबाईलवरून चालतं. अनेकांच्या मनोरंजनाचे साधन ठरलेला हा मोबाईल सध्याच्या मानवी जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. 

मोबाईल वापरणाऱ्या सर्वांसाठी एक आनंदाची बातमी आहे. फार पूर्वी सॅमसंग कंपनीचा 59 हजार रुपयांना मिळणारा मोबाईल आता अवघ्या 29 हजार रुपयांना मिळणार आहे. येत्या प्रजासत्ताकदिनापासून (दि. २६) सॅमसंग कंपनीचा हा मोबाईल विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे यामध्ये डिस्काउंट आणि एक्सचेंज ऑफरसुद्धा उपलब्ध आहे. 

सॅमसंग कंपनीचा हा मोबाईल तुम्हाला जर विकत घ्यायचा असेल तर तुमच्या गावात शहरात असलेल्या मोबाईल विक्रेत्याकडे तुम्ही आजच चौकशी करून ठेवा. या मोबाईलची काय काय वैशिष्ट्ये आहेत, या मोबाईलमध्ये कोण कोणते फीचर्स आहेत, ही सर्व माहिती तुम्ही तुमच्या जवळच्या मोबाईल दुकानात जाऊन जाणून घेऊ शकता. 26 जानेवारीपासून हा मोबाईल विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे मोबाईल वापरणाऱ्या सर्वांनीच याकडे लक्ष ठेवण्याची आवश्यकता आहे.

 

Advertaismentspot_img

Related Articles

Stay Connected

0FansLike
0FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

महत्वाच्या घडामोडी