लोकपत डिजिटल मीडिया / अहिल्यानगर
अहिल्यानगरच्या जामखेड तालुक्यात असलेल्या चोंडी गावात दिनांक 29 एप्रिल रोजी होणारी राज्य मंत्रीमंडळाची बैठक आता सहा मे रोजी होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह 42 मंत्री या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. मंत्रीमंडळाच्या या बैठकीत अहिल्या नगरच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांपासून विविध योजनापर्यंतच्या परिपूर्ण विकासाच्या पॅकेजवर विशेष भर दिला जाणार असल्याचं सूत्रांनी सांगितलंय.
अहिल्याबाई होळकर
यांच्या त्रिशताब्दीनिमित्त होणाऱ्या कार्यक्रमाचं औचित साधून राज्य मंत्रीमंडळाचे बैठक चौंडी या गावात होणार आहे. या बैठकीच्या तयारीसाठी जिल्हा प्रशासनाला वेळ मिळावा, म्हणून 29 एप्रिल ऐवजी सहा मे रोजी ही बैठक घेण्यात येणार आहे. दरम्यान, होळकर यांच्या सन्मानार्थ माहिती सरकारने अहमदनगरचं नाव बदलून अहिल्यानगर केलं आहे.
अहिल्याबाई होळकर यांचा जन्म मे १७२५ मध्ये अहिल्यानगरमधील चोंडी इथे झाला. त्यांचे वडील पाटील मानकोजी शिंदे हे धनगर कुळातले होते. ऐतिहासिकदृष्ट्या धनगर हा एक मेढपाळांचा समुदाय होता. त्यांनी मराठ्यांच्या उदयात महत्त्वाची भूमिका बजावली.
अहिल्याबाईंचा विवाह १२ व्या वर्षी सुभेदार मल्हारराव होळकर यांचे पुत्र खंडेराव होळकर यांच्याशी झाला. ते मराठा साम्राज्याचे एक प्रमुख राजे होते. १७५४ मध्ये त्यांचे पती खंडेराव आणि नंतर १७६६ मध्ये त्यांचे सासरे मल्हारराव यांच्या अकाली निधनानंतर तीव्र विरोधाला तोंड देत अहिल्याबाई सिंहासनावर विराजमान झाल्या. त्यांनी सक्षम महिला शासक म्हणून त्यांचा असाधारण ठसा उमटवला.
अहिल्याबाईंनी केलेल्या सार्वजनिक कल्याणकारी प्रयत्नांमुळे आणि प्रार्थनास्थळांच्या नूतनीकरण आणि बांधकामात केलेल्या योगदानामुळे राज्य नव्याने उभे राहिले. त्यांनी होळकर प्रदेशात रस्ते, विहिरी, घाट, मंदिरे आणि धर्मशाळादेखील बांधल्या. लग्नानंतर त्यांचे संपूर्ण आयुष्य आणि होळकर साम्राज्याच्या शासक म्हणून नंतरचा काळ त्यांनी मध्यप्रदेशातल्या इंदूर इथे घालवला.