लोकपत न्यूज नेटवर्क / अहिल्यानगर
नेवासे तालुक्यातल्या सोनईजवळ असलेल्या कन्हेरवस्ती इथं 69 हजार रुपये किंमतीचा कापूस अज्ञात चोरट्यांनी चोरून नेलाय. दिनांक 29 डिसेंबर रोजी ही घटना घडली. याप्रकरणी देवीदास दिनकर जामदार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सोनई पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
जामदार यांनी 63 हजार रुपयांचा कापूस विकला आहे. मात्र उर्वरित कापूस त्यांनी पत्र्याच्या शेडमध्ये ठेवला होता. या कापसाला सहा हजार नऊशे रुपये प्रतिक्विंटल असा भाव मिळाला होता. 17 क्विंटल कापूस आज्ञा चोरट्याने सुरू नेल्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी जामदार यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं आहे.
एकीकडे राज्य शासन शेतमालाला हमीभाव देत नाही. दुसरीकडे पिकांवर पडणाऱ्या रोगांमुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होतं. त्याचवेळी अशा चोऱ्या होत असतील तर शेतकऱ्यांनी कोणाच्या भरवशावर राहायचं, हा मोठा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे. सोनई पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असता तरी स्थानिक पोलीस कर्मचाऱ्यांची रात्रीची पोलीस जास्त सुरू आहे की नाही, हाच मोठा प्रश्न आहे.