लोकपत न्यूज नेटवर्क / नागपूर
राज्यातल्या 13 कोटी जनतेच्या इच्छेप्रमाणं महाराष्ट्राला स्थिर सरकार देणार असून लाडकी बहीण योजना यापुढे
देखील सुरूच ठेवणार आहोत. लाडक्या बहिणींना 2100 रुपये दर महिन्याला देणार असून बजेटच्या वेळी त्यासंदर्भात विचार केला जाईल. दिलेली सर्व आश्वासनं आम्ही पूर्ण करणार आहोत. ज्या लाडक्या बहिणी या योजनेच्या निकषांमध्ये बसणार नाहीत, त्यांचा पुनर्विचार करणार आहोत, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात बोलताना केली. मंत्रीमंडळ विस्ताराच्या संदर्भात ते पत्रकारांशी बोलत होते.
दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा दहा दिवसांनंतर विस्तार होत आहे. या मंत्रीमंडळामध्ये ज्यांचा समावेश होऊ शकतो, त्यांची नावं पुढील प्रमाणे आहेत.
1. देवेंद्र फडणवीस
2. गिरीश महाजन
3. रविंद्र चव्हाण
4. मंगलप्रभात लोढा
5. चंद्रशेखर बावनकुळे
6. आशिष शेलार
7. नितेश राणे
8. शिवेंद्रसिंहराजे भोसले
9. राहुल कुल
10. माधुरी मिसाळ
11. संजय कुटे
12. राधाकृष्ण विखे पाटील
13. गणेश नाईक
14. पंकजा मुंडे
15. गोपीचंद पडळकर
शिवसेना शिंदे गटाची संभाव्य मंत्र्यांची यादी-
1. एकनाथ शिंदे
2. उदय सामंत
3. शंभूराजे देसाई
4. गुलाबराव पाटील
5. दादा भुसे
6. प्रताप सरनाईक
7. संजय शिरसाठ
8. भरत गोगावले
9. आशिष जयस्वाल
10. योगेश कदम
11. विजय शिवतारे
12. आबिटकर किंवा यड्रावकर
अजित पवार गटाच्या संभाव्य मंत्र्यांची यादी-
1. छगन भुजबळ
2. आदिती तटकरे
3. अनिल पाटील
4. संजय बनसोडे
5. अजित पवार
6. मकरंद पाटील
7. नरहरी झिरवाळ
8. धनंजय मुंडे
राज्यमंत्री –
1. सना मलिक
2. इंद्रनील नाईक.